शालेय विद्यार्थिनी समोर हस्तमैथुन करणाऱ्या आरोपीला घुग्घुस पोलीसांनी अटक केले
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस : देशात बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा दिल्या जात आहेत तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशासमोर उभा झालेला आहेत.
दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत देशातील महिला असुरक्षित आहेत.
घुग्घूस शहरातून एक मेंदूला झिनझीन्या आणणारा प्रसंग समोर आला असून पालकवर्गात आपल्या मुलींना घेऊन चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहेत.
दिनांक 22 मार्च 2025 शनिवार रोजी सकाळी शाळेत जात असतांना शाळेतून परत येत असतांना चिल्ड्रेन पार्क परिसरात एक मानसिक विकृतिचा इसम मुलींना पाहून हस्तमैथुन करीत असल्यामुळे संतप्त पालकांनी याची तक्रार पोलिसांना दिली असता पोलिसांनी या विकृत इसमाला अटक करून न्यायालयात हाजीर केले असता न्यायाल्याने न्यायालयीन कस्टडीत पाठविले आहेत.
शालिकराम नगर येथे राहणारा सागर आरापेल्ली वय वय 39 वर्षे हा लाल रंगाची कार क्रमांक एम एच 34 सी डी, 8166 बेलेनो कार मध्ये सुभाष नगर चिल्ड्रन्स पार्क, सुभाषचंद्र बोस बाल उद्यान जवळ कार उभी करुन शाळेतील अल्पवयीन मुलींना पाहून स्वतःच्या पैंट खाली करुन गुप्तांग (प्रायव्हेट पार्ट ) दाखवून मुलींना घाणेरड्या इशारे करीत हस्तमैथुन करीत होता
अल्पवयीन मुलींनी सदरची घटना तिच्या आईच्या सांगितल्यावरुन अल्पवयीन मुलीचे आईने घुग्घुस पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्यावरुन पोलीस स्टेशनला कलम 74, 75, (2) बी. ए. एन.भारतीय न्याय सहीता व कलम 12 पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद करुन आरोपीला अटक करण्यात आले व त्याचे वाहन घुग्घुस पोलीस स्टेशनला जप्त करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता कारागृहात पाठवण्यात आले,व पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे,