विरार येथील कोविड रुग्णालयाला भीषण आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.23 एप्रिल:- मुंबईच्या विरार परीसरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विरारच्या कोविड रुग्णालयामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागली. या कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 कोरोना वायरस बाधीत रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगर येथील पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही भिषण आग लागली. रुग्णालयाचा कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत 13 कोरोना वायरस बाधीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य कोरोना वायरस बाधीत रुग्णांना इतरत्र रुग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
विरारच्या तिरुपती नगरमध्ये विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. पहाटे 3 वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील कोविड अतिदक्षता विभागाला आग लागली होती. विरार अग्निशमन दलाचे 03-फायर वाहनांनी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास या भिषण आगीवर नियंत्रण मीळवले. या कोविड रुग्णालयात एकूण 90 कोरोना वायरस बाधीत रुग्ण उपचार घेत होते.
रुग्णालयाला आग लागल्याने नातेवाईकांचा आक्रोश:-
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मधील 17 पैकी 13 जण दगावले तर अन्य 4 व अन्य रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे विजय वल्लभ रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर सांगितले. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे.
सदर घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे:-
1) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष 63)
2) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष 35)
3) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष 68)
4) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष 60)
5) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष 58)
6) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष 63)
7) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष 45)
8) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष 55)
9) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष 65)
10) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष 23)
11) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष 48)
12) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष 64)
13) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष 43)