23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन...
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन…

लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन...
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन…

जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. 23 एप्रिल याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.याच दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.

इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. सध्या मोबाइलवर अनेक अॅप उपलब्ध आहेत इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. अनेकदा या तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. इंटरनेटवर कोणतीही माहिती मिळून जाते ना मग पुस्तक का वाचायचं असं सध्याच्या पिढीला वाटतं. त्यामुळे सध्या पुस्तक वाचण्याकडे तरुणांचा कल कमी झाला आहे. जो तो मोबइलमध्ये बिझी झाला आहे. आपण जशा इतर गोष्टींची सवय लावतो, त्याप्रमाणे पुस्तक वाचनाचीही सवय लावली तर त्यात कुठे नुकसान आहे.

वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी.तुमचे शब्दसंग्रह आणि ज्ञानात भर पाडायचं असेल तर चला तर मग आजपासून का होईना पुस्तकांच्या वाचनाला जरुर सुरुवात करा. आणि हो खत पाणी म्हणून इतर माध्यमांचाही वापर करा.

पुस्तकं फक्त माहिती देतात, काही फक्त अनुभव मांडतात, काही ज्ञान देतात तर काही शहाणपण देतात. हे सगळं वाचक म्हणून एक माणूस म्हणून आपल्यासाठी आवश्यक वाटतं.    पुस्तकांनं माणसं घडतात तशी अगदीच कधीतरी बिघडतातही. जेव्हा आपण नवे वाचक असतो तेव्हा लेखकामुळे, भाषेमुळे, विचारांमुळे प्रभावित होतो. कालांतराने त्याच्या वाचनाची, विचारांची व्याप्ती वाढली की तो तुलना करायला लागतो. वास्तवदर्शी पुस्तकं, कादंबरी यातील त्याला हवं ते निवडू लागतो. पुस्तक वाचताना आपण त्यातील पात्रांपेक्षा वेगळे आहोत, आपलं जगणं वेगळं आहे हे त्याच्या लक्षात येतं. कधी तो त्यातील संवेदना स्वत:च्या व्यक्तीमत्त्वात रुजवतो किंवा कधी ती निर्धाराने बाजूलाही ठेवतो.

पुस्तक प्रेमींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर

खरं तर पुस्तकप्रेमींमध्ये भारतीय इतिहासात प्रथमच कित्येक दशकांपूर्वी खास पुस्तकांसाठीच घर बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना असलेले पुस्तकांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बंगला बांधला होता ज्यात विविध भाषेंतील जवळपास ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा ठासून भरलेली आहेत.

एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते. पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितला होता. यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. कारण ‘आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे.’ असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके त्यांचे पुस्तकांवर प्रेम होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here