पांढरी (गायमुख) येथे शेतीला आग, संत्रा झाडे, गहु, व प्लास्टीक पाईप जळुन खाक. 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान.
पांढरी (गायमुख) येथे शेतीला आग, संत्रा झाडे, गहु, व प्लास्टीक पाईप जळुन खाक. 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान.

पांढरी (गायमुख) येथे शेतीला आग, संत्रा झाडे, गहु, व प्लास्टीक पाईप जळुन खाक. 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान.

पोलीसात तक्रार: शेतकर्‍याची नुकसान भरपाईची मागणी 

पांढरी (गायमुख) येथे शेतीला आग, संत्रा झाडे, गहु, व प्लास्टीक पाईप जळुन खाक. 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान.
पांढरी (गायमुख) येथे शेतीला आग, संत्रा झाडे, गहु, व प्लास्टीक पाईप जळुन खाक. 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/मोवाड.दि. 23 एप्रिल:- येथुन अगदी तीन किमी. अंतरावरील महाराष्र्ट व मध्यप्रदेशच्या सिमेलगत असलेल्या पांढरी (गायमुख) या गावातील शेतकर्‍याच्या शेतात लागलेल्या आगीत सोंगणीला आलेला ऊभा गहु, संत्रा झाडे  व प्लास्टीक पाईप जळुन राख झाल्याने 10 लक्ष, 41 हजार रुपयाचे नुकसान झाले असुन त्यासंदर्भात आग घडऊन आणणार्‍या गावातीलच शेतकर्‍यावीरूध्द मोवाड पोलीस चौकीत नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍याने ऊचीत कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍याने तक्रारीत नमुद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मोवाड शहरापासुन अगदी तिन किमी अंतरावर मौजा पांढरी(गायमुख) या ग्रामपंचायतीच्या गावातील शेतकरी भैय्याजी मोतीराम नारनवरे 76 यांची गावालगत दोन एकर ओलीताची शेती असुन शेतात 225 पाठा संत्रा झाडे व त्यावर अडीच तिन लाख अंबीया बहाराचे संत्री लागलेले आहेत. तसेच संत्रा झाडातच दिड एकरमध्ये गहु पेरला असुृन तो आता लगेच कापायला आला होता. शेताला लागुनच असलेल्या ठेक्याच्या शेतात पांढरी गावातीलच शेतकरी दुर्गादास नैनसींग मेंडोले हा मागील वर्षापासुन लगतच्या बेलोना या गावातील शेतकर्‍याचे शेत ठेक्याने करीत आहे. दुर्गादासने दोन आठवड्याआधीच पेरलेला त्याचा गहु कापुन त्याची मळणी करून घरी घेऊन गेला होता. त्याच्या शेतात केवळ गवंडा व जनावरांच्या कुटाराचा ढिग राहीलेला होता. मात्र, बाजुच्या शेतातील भैय्याजी नारनवरे यांचा गहु आता कापणीला आला होता. आता दोन तिन दवसात गव्हाची कापणी करणार होते. परंतु पुढील शेती मशागतीसाठी लागणार्‍या पैशाची अडचण भासणार म्हणुण भैय्याजी नारनवरे हे त्यांच्या मुलाकडे नागपूरला गेले होते.

घटनेच्या दिवशी दि.20 मंगळवारला दुपारी 3.30 च्या दरम्यान भैय्याजी नारनवरे यांच्या शेतात आगीचे लोट ऊसळतांनी ऊभ्या गव्हाचा व त्याचबरोबर संत्राची झाडे जळत असल्याचे शेजारील शेतकरी ऊत्तम नारनवरे यांनी बघीतले. त्यांनी आरडा ओरडा करून आणखी शेजारील इतर शेतकर्‍यांना बोलाऊन प्रसंगी मिळेल ती ऊपाययोजना करून आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न केला, मात्र तेवढ्या वेळात शेतातील संपुर्ण गव्हाचा पट, अंबीया संत्र्याने लदबद संत्रा झाडे, ओलीतासाठी वापरण्यात येणारा प्लास्टीक पाईप एवढा एवज जळुन राख झाला होता. ही आग बाजुच्या शेतातील शेतकरी दुर्गादास नैनसींग मेंडोले हा त्याच्या शेतातील गव्हाचे फण पेटवीत असतांनी तेथील प्रत्यक्ष दर्शीनी बघीतले होते. हवेमुळे ही आग वाढत जाऊन यांचा शेतात लागल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्या शेताशेजारी असणारा शेतकरी दुर्गादास मेंडोले याने ठेक्याने केलेल्या शेतीत गव्हाचे फण पेटवत असल्याने आग लागली असुन त्याने केलेल्या हेतुपुरस्पर व दुर्लक्षीत व्यवहाराने माझ्या शेताचे नुकसान झाले आहे. त्याचेविरूध्द ऊचीत कार्यवाही व्हावी व मला नुकसान भरपाई देण्यात यावी.

त्रस्त शेतकरी भैय्याजी नारनवरे रा. पांढरी (गायमुख).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here