चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी केली ऑक्सीजन प्लांटची पाहणी; कोविड रुग्णांसाठी जादा ऑक्सीज पुरवठा करण्याचे निर्देश.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 23 एप्रिल:- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य ऑक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ऑक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली.
कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज असून ऑक्सीजनचा जास्तीत जास्त पुरवठा त्यांचेसाठी करण्यात यावा असे निर्देश त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. ऑक्सीजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना दिले. यावेळी तहसीलदार निलेश गौड व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड हे उपस्थित होते.