मुंबईत बनावटी कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश. सामाजिक नराधमांना अटक.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि23 एप्रिल:- मुंबईतील भिवंडी शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना वायरस रुग्णांचे बनावट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल तयार करून अवघ्या 500 रुपयात विकणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबच्या भाडाफोड मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सामाजिक नराधम मालकासह चार आरोपीना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मुंबई परीसरात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यात सामाजिक नराधम आपल्या कृत्य आणि कारवायामुळे संपुर्ण समाजाला कलंकीत करत आहे. या महामारीचा फायदा घेऊन लोकांनची लूट करत आहे. असा नराधमांना मुंबई पोलिसांनी अटक केली त्यांत रब्बनी अनवारूल हक सैयद वय 31 वर्ष, अफताब आलम मुजीबुल्ला खान वय 22 वर्ष व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख वय 20 वर्ष मेहफुज आलम मुजीबुल्ला खान वय 29 वर्ष असे मुंबई पोलिसांनी अटक केलेलया सामाजिक नराधमांचे नाव आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई भिवंडीतील शांतीनगर परिसरात आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोनाचे निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट अहवाल 500 रुपयात बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला कळताच मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदिया शाळेसमोर असलेल्या महेफुज लॅबोरेटरी येथे बनावट ग्राहकाला निगेटिव्ह अहवाल घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणीकरिता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता निगेटिव्ह अहवाल थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट अहवाल देताना महेफुज लॅबमधील तिघांना पकडले. या लॅबची झडती घेतली असता आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण 64 जणांचे अहवाल सापडले. त्यामध्ये 59 हे निगेटिव्ह व 5 पॉझिटिव्ह होते. या प्रकरणी लॅब टेक्निशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची चौकशी केली असता त्यांनी हे बनावट अहवाल लॅबमध्ये मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या मदतीने तयार केल्याची कबुली दिली.