पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या कोडशी खुर्द येथील घटना; चिमुकले झाले पोरके

✒️मनोज खोब्रागडे✒️
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (कोरपना) :- पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खू येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, कोडशी खू येथील सुनील मधुकर डवरे (३५) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी रॉड ने डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यात अलका सुनिल डवरे (२६) हीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलने स्वतःहून घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर घटनेचा पोलीस मार्फत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आला. मृतक दाम्पत्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. ते दोन्ही आई – वडीला विना पोरके झाले आहे.

घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here