कोरपना तालुक्यातील मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू.
कोरपना तालुक्यातील मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू.

कोरपना तालुक्यातील मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू.

136 कामगारांना रोजगार देण्याचे कंपनी ने मान्य केले. कामगारांनी हंसराज अहीर व युनीयनचे आभार मानले आहे.

कोरपना तालुक्यातील मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू.
कोरपना तालुक्यातील मुरली सिमेंटच्या जुन्या कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील नारंडा स्थित मुरली सिमेंट इंडस्ट्रीज मध्ये अनेक कामगार काम करीत होते. परंतू ती कंपनी बंद पडली व सर्व कार्यरत कामगार बेरोजगार झाले. जवळपास 6 ते 7 वर्षानंतर मुरली सिमेंट इंडस्ट्रीज, दालमीया भारत कंपनीने विकत घेतली, त्यामुळे मुरली सिमेंट इंडस्ट्रीज मध्ये पूर्वी काम करत असलेल्या कर्मचारी व कामगारांची रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली. मुर्ली सिमेंट कंपनीच्या पूर्व कामगारांना रोजगार मिळवून देण्याकरीता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी  हंसराज अहीर यांचे मार्गदर्शनात खुशाल बोंडे यांच्या अध्यक्षतेमध्ये नारंडा सिमेंट कामगार संघाची स्थापना करण्यात आली.

हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात व कामगार संघाच्या माध्यमातून दालमिया भारत सिमेंट व्यवस्थापना सोबत अनेकदा बैठका घेण्यात आल्या हे सुरू असतांना हंसराज जी अहीर यांच्या सूचनेवरून भारतीय मजदुर संघाशी नारंडा सिमेंट संघ संलग्न करण्यात आला. भारतीय मजदुर संघ तर्फे निंदेकरजी यांना प्रभारी म्हणुन नियुक्त करण्यात आले.  हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात व अनुभवी कामगार नेते निंदेकर व युनीयन मिळुन दालमिया भारत व्यवस्थापनाशी, कामगार आयुक्ताशी अनेक बैठका घेण्यात आल्या. यानंतर व्यवस्थापनाने शेवटी मुर्लीच्या पूर्व कामगारांना कामावर घेण्याचे मान्य केले.

त्यानुसार मुर्ली सिमेंट इंडस्ट्रीज मधील पूर्व 136 कामगारांची निवड करण्यात आली. यामध्ये 125 कामगार आणि 10 कामगार अगोदरच पाॅवरप्लाॅट मध्ये युनियनच्या माध्यमातून कामावर आहेत. पैकी एक कामगार मयत आहे असे एकंदर 136 कामगारांना रोजगार देण्याचे कंपनी ने मान्य केले आहे. या कामगारांना 1 महिन्याच्या आत कामावर घेण्याचे मान्य केले आहे. तसेच उर्वरीत कामगारांच्या मुलाखती लवकरच करून त्यांनाही कामावर घेण्यासाठी युनीयनच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. हे यश मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन कामगारांनी हंसराज अहीर व युनीयनचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here