शिवतीर्थ समरभूमी उंबरखिंड नैसर्गिक पर्यटन स्थळाचे भुमिपूजन संपन्न

शिवतीर्थ समरभूमी उंबरखिंड नैसर्गिक पर्यटन स्थळाचे भुमिपूजन संपन्न

शिवतीर्थ समरभूमी उंबरखिंड नैसर्गिक पर्यटन स्थळाचे भुमिपूजन संपन्न

✍ राकेश देशमुख ✍
महाड शहर प्रतिनिधी
मो.७८८७८७९४४४

खालापूर(रायगड):-उंबरखिंड ता. खालापूर येथे शिवतीर्थ समरभूमी उंबरखिंड नैसर्गिक पर्यटन स्थळाचे भूमिपुजन मा.रायगड जिल्ह्य़ाचे पालक मंत्री कु.आदिती ताई तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी आ.श्री. महेंद्र थोरवे, रा.जि.प.उपाध्यक्ष श्री. FC सुधाकर घारे, जि.प.सदस्य श्री. नरेश पाटील, पं.स.सदस्या सौ. श्रध्दा साखरे, वन विभागाचे उपवन संरक्षक श्री. आशिष ठाकरे, तहसिलदार श्री. अय्युब तांबोळी, युवक जिल्हाध्यक्ष श्री. अंकीत साखरे, श्री. विवेक भोपी, नगरसेवक श्री. संकेत भासे, श्री. विजुभाई पाटील, माजी सभापती श्री. भाई शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, शिवप्रेमी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवरांच्या पदस्पर्शाने पालन झालेल्या रायगड जिल्ह्यात आपण जन्माला आलो याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. हा ऐतिहासिक वारसा आपल्याकरीता मर्यादित न राहता पुढील पिढीपर्यंत पोहचला पाहीजे. गड किल्ल्यांचे संरक्षण आपल्याकडून होईल त्यादिवशी आपल्याकडून खरा मानाचा मूजरा छत्रपती शिवरायांना असणार आहे. उमरखिंडसाठी प्रादेशिक पर्यटनातून पहिल्या टप्प्यात रू. ८२ निधी मंजूर करण्यात आला आहे. तदनंतर रू. १ कोटी ५३ लक्ष किंमतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यास्थळाच्या विकासाकरीता सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी असलेला पोच रस्ता तसेच सर्व सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येईल. येथे झालेल्या युध्दाला “बाणाचे युध्द” असे म्हणतात अशी इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास सर्वांपर्यंत पोहचला पाहीजे असा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here