आदर्श गाव योजना
आढी,श्रमदानाची उभारली गुढी.
✒राकेश सुरेश देशमुख ✒
महाड शहर प्रतिनिधि
मो.7887879444/8087462957
महाड : -पाडवा झाला आणि ग्रुप ग्रामपंचायत आढी चा आदर्श गाव योजनेत समावेश करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती पुणे यांनी भेट देऊन गावाची पहाणी करण्यात आली.परिसराची पाहणी झाली.यावेळेस विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे आढी,डोंगरोली,दत्तवाडी,गवलवाडी येथील सर्व महिला,ग्रामस्थ,ग्रामपंचायत चे सरपंच श्री विलास चव्हाण उप सरपंच श्री.रोहित महाडिक व सर्व सदस्य आनि प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा लोकजागर सामाजिक संस्था अध्यक्ष जगन्नाथ साळुंके,नितीन पवार व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत कृषि उप संचालक मा.श्री.भालेराव साहेब व तांबे साहेब यांनी ग्रामसभेत दिलेल्या सुचनेनुसार आढी गावात आदर्श गाव योजनेचे उद्घाटन मा.सरपंच श्री.विलास चव्हाण यांच्या हस्ते श्रमदाना चा नारळ फोडून करण्यात आले. श्रमदानामध्ये सर्व ग्रामस्थ, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रमदानातून नवीन आंगणवाडी इमारत बाधण्यासाठी ची जागा साफसफाई,मंदिराचे साहित्य वाहतूक तसेच आढी ते गवलवाडी पायवाट रस्ता तयार करणे इत्यादी कामे घेऊन ती आता पूर्ण करण्यात आली.आदर्श गाव योजना मंजूर झाल्यामुळे गावातील प्रत्येक घटकामध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला असून युवक वर्गाने मोठा पुढाकार या कामात घेतला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला बचत गट,ग्राम कार्यकर्ता श्री.दिनेश तांबे,श्री.नरळकर यांनी विशेष मेहनत घेतली.महाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा.पोळ साहेब,तसेच उप विभागीय कृषि अधिकारी मा.ताठे साहेब,कृषि पर्यवेक्षक कोकरे साहेब व ग्रामसेवक अर्बन सर यांनी या कामाला शुभेच्छा दिल्या