महाडमध्ये वादळी वाऱ्यासह कांही भागात पाऊस शिरगाव आदिवासीवाडीवर घरकुलाची भिंत कोसळली

महाडमध्ये वादळी वाऱ्यासह कांही भागात पाऊस
शिरगाव आदिवासीवाडीवर घरकुलाची भिंत कोसळली

महाडमध्ये वादळी वाऱ्यासह कांही भागात पाऊस शिरगाव आदिवासीवाडीवर घरकुलाची भिंत कोसळली

✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : -महाड तालुक्यात गेली कांही दिवस पावसाचे चिन्ह दिसून येत होते. बदललेल्या तापमानामुळे शुक्रवारी सायंकाळी अचानक ढग दाटून येवून तालुक्यातील कांही भागात पाऊस तर कांही भागात वादळी वाऱ्याने नुकसान केले. या वादळी वाऱ्यामुळे शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडी येथे एका घराची भिंत कोसळली.
महाड तालुक्यात गेली कांही दिवस सातत्याने बदलणाऱ्या तापमानामुळे मानवी जीवन हैराण झाले आहे. हवेतील उष्मा वाढतच असला तरी शुक्रवारी सायंकाळी जोरात वादळी वारा आणि पाऊस आल्याने अनेकांची पळापळ झाली. ऐन खरेदीच्या वेळेतच अचानक उठलेल्या वादळाने वातावरणात प्रचंड धूळ निर्माण झाली. या धुळीने आणि वाऱ्याबरोबर आलेल्या कचऱ्याने अनेकांना त्रास झाला. तालुक्यातील आणि शहरातील कांही भागात पाऊस पडला. बिरवाडी विभागात तसेच किल्ले रायगड भागात पाऊस पडला. या पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि लग्न सोहळे आटोपते घ्यावे लागले. या वादळी पावसामुळे आंबा, करवंद, आदी रानटी फळे धोक्यात आली आहेत. पडलेल्या पावसामुळे दुसऱ्या दिवशी वातवरण देखील चांगलेच तापले आहे. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले आहेत.
महाड शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडीवरील संतोष पवार याच्या घरकुलाची एक भिंत कोसळली. बाहेर सुरु असलेल्या वादळातच भिंत कोसळल्याने घरात असलेल्या पावर कुटुंबाचे मोठे हाल झाले. घरातील सामान, बिछाना देखील या भिंतीतच सापडला.