कन्हाळगाव येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे मो.9923358970
कोरपणा आज 23 एप्रिल रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता
मनोज गोरे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :- कोरपना श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त कन्हाळगावातील विविध हनुमान मंदिरात पूजा, आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हनुमान मंदिर कन्हाळगाव मंदिरात पूजा व आरती भजन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुराणानुसार हनुमानजींना भगवान श्रीरामाचे महान भक्त मानले जाते. हनुमानजींची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. हनुमानजींच्या दर्शनासाठी येथील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. गावातील प्रमुख मार्गावर हनुमानजींच्या जयघोषाने दुमदुमले. हनुमानजींची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.