उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मा. उषा घोडेस्वार, व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार व प्रमुख मा. गंगाधर धुवाधपारे यांना छत्रपत्री शिवाजी महाराज पुरस्कार २०२५
मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो. 9860020016
भंडारा :- दैनिक मीडिया वार्ता न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक १६/०४/२०२५ रोजी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले सभागृह, पनवेल जिल्हा रायगड येथे करण्यात आले. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मान्यवरांचे येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. येथे उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली जिल्हा भंडारा संचालिका मा. उषा घोडेस्वार, केंद्राचे व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार व केंद्र प्रमुख मा. गंगाधर धुवाधपारे यांना आदर्श समाजसेवक विशेष व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात याले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी जेष्ठ नेते, माजी खासदार मा. रामशेखर ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संजय बांगर सर, जिल्हा बँक कार्यकारी अधिकारी मा. मंदार सर, दैनिक मीडिया वार्ता न्यूजचे मुख्य संपादक मा. भागुराम सावंत, दैनिक मीडिया वार्ता न्यूजचे सह संपादक मा. मनोज खोब्रागडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला.