केंद्र सरकारने दिले म्युकरमायकोसिस आजाराचे फक्त 200 इंजेक्शन्स.
केंद्र सरकारने दिले म्युकरमायकोसिस आजाराचे फक्त 200 इंजेक्शन्स.

केंद्र सरकारने दिले म्युकरमायकोसिस आजाराचे फक्त 200 इंजेक्शन्स.

केंद्र सरकारने दिले म्युकरमायकोसिस आजाराचे फक्त 200 इंजेक्शन्स.
केंद्र सरकारने दिले म्युकरमायकोसिस आजाराचे फक्त 200 इंजेक्शन्स.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.23 मे:- राज्यात मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण समोर येत आहे. या भयंकर आजारा विषयी लोकांत मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण दिसून येत आहे. तर दुसरी कडे केंद्र सरकार मोदी सरकार हे महाराष्ट्रा बरोबर दुजा भाव करत असल्याचे समोर येत आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला तीस ते चाळीस इंजेक्शन लागतात. मात्र केंद्राकडून फक्त दोनशे इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोटा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली.

नागपुर आणि राज्यात मुक्यमसायकोसिसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याकरिता वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारला आम्ही कोटा वाढवून देण्याची मागणी वारमवार करत आहोत परंतु तो अद्याप वाढवून दिलेला नाही. इंजेक्शनची निर्मिती केंद्र सरकारने आपल्याकडे घेतली आहे. ते ज्या पद्धतीने देतील त्या पद्धतीनं वाटप होईल. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ती पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here