गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.23:- आज जिल्हयात 168 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28710 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26190 वर पोहचली. तसेच सद्या 1830 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 690 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 7 नवीन मृत्यूमध्ये 75 वर्षीय पुरुष गुड्डीगुडाम ता.अहेर, 45 वर्षीय पुरुष माडेमगांव ता.चामोर्शी , 72 वर्षीय पुरुष कुलकुली ता.आरमोरी, 72 वर्षीय पुरुष धुनडेशिवनी गडचिरोली, 61 वर्षीय पुरुष शाहु नगर वार्ड न. 21 गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 70 वर्षीय महिला आार्शिवाद नगर गडचिरोली याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.37 टक्के तर मृत्यू दर 2.40 टक्के झाला.

नवीन 168 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 28, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी 8, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 76, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 3, कोरची तालुक्यातील 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 13 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 63, अहेरी 3, आरमोरी 2, भामरागड 06, चामोर्शी 19, धानोरा 21, एटापल्ली 9, मुलचेरा 8, सिरोंचा 18, कोरची 13, कुरखेडा 13 तसेच वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here