जंगलात झाडाला लटकलेला मिळाले अल्पवयीन मुला -मुलीचा मृतदेह. अमरावतीत एकच खळबळ.

✒️मुकेश चौधरी विदर्भ ब्युरो चीफ✒️
अमरावती, दि.23 मे:- अमरावती येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात एका 17 वर्षीय मुलाचा आणि 16 वर्षीय मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हे मृतदेह माघिल तीन-चार दिवसांपासून असेच लटकलेले असावेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हे दोघेजण 13 मेपासून बेपत्ता होती. या दोघांनी आत्महत्या केली की, हा घातपात आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मयूर अमेंद्र कांबळे आणि गायत्री असे मृत मुलामुलींची नावे आहेत. हे दोघेही अमरावतीमध्ये राहत होते. या दोघांचे मृतदेह गुरुवारी दुपारी महादेव खोरी परिसरातील एका जंगलात सागाच्या झाडाला लटकावलेल्या अवस्थेत सापडले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ते मृतदेह झाडावरून खाली उतरवले. हे दोन्ही मृतदेह मागील तीन ते चार दिवसांपासून लटकलेल्या अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयूर आणि गायत्री घरात न दिसल्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांकडून दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here