नागपुरातील भूमाफियाने कोरोडो रूपयाच्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या.
नागपुरातील भूमाफियाने कोरोडो रूपयाच्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या.

नागपुरातील भूमाफियाने कोरोडो रूपयाच्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या.

नागपुरातील भूमाफियाने कोरोडो रूपयाच्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या.
नागपुरातील भूमाफियाने कोरोडो रूपयाच्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.23 मे:- उपराजधानी नागपुरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर गुन्हे शाखेने अटक केलेल्या भूमाफिया संजय धापोडकर याने कुख्यात गुंड रंजीत सफेलकर आणि त्यांच्या गुंड्याशी संगममत करुन नागपूर जिल्हातील अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्याही जमिनी असून, प्रतिबंध असतानादेखील या जमिनीवर त्याने लेआउट टाकून हजारो लोकांना भूखंड विकल्याची माहिती चर्चेला आली आहे.

नागपुर जवळच्या कामठी येथील शेतकरी बाप आणि मुलाचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत कुख्यात गुंड रंजीत सफेलकर, भूमाफिया संजय धापोडकर आणि त्यांच्या साथीदारांनी कोट्यवधींची जमीन हडपली होती. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सफेलकर, धापोडकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. सध्या ते गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहेत.

नागपुर गुन्हे शाखेचा पोलिसांनी केलेल्या चौकशीतून फसवणुकीचे अनेक गुन्हे उघड होत आहेत. दुसरीकडे फसगत झालेल्या शेतकरी आणि जनतेच्या तक्रारीं मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, धापोडकरने नागपूर शहराला लागून असलेल्या भिलगाव, येरखेडा, कामठी, कामगारनगर, कळमना, बुटीबोरी हिंगणा, वाडी कान्होलीबारा, कळमेश्वर आदी ठिकाणीही शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणुकीचा माध्यमातून हडपल्या असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यातील अनेक जमिनी आदिवासींच्या आहेत. त्या विकता येत नसल्याचे माहीत असूनही त्यावर लेआउट टाकून धापोडकर आणि साथीदारांनी हजारो लोकांना भूखंड विकले आणि त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here