मराठा समाजाचा बीड मधून निघणार 5 जूनला पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा!
मराठा समाजाचा बीड मधून निघणार 5 जूनला पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा!

मराठा समाजाचा बीड मधून निघणार 5 जूनला पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा!

मराठा समाजाचा बीड मधून निघणार 5 जूनला पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा!
मराठा समाजाचा बीड मधून निघणार 5 जूनला पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा!

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.23 मे :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणच्या वैधतेवर महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षण हे संविधानात बसणारे नाही असं म्हटंल आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मराठा आरक्षण हे 50 टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आहे. मराठा आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वैध कारण नाही असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केल होते. त्यामुळे मराठा समाजाते आरक्षण हे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजन आक्रमक झाला आहे. ‘मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला बीड जिल्हात पहिला मराठा मोर्चा निघणारच’, अशी घोषणा मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी केली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

आज बीड शहरात शासकीय विश्राम गृह या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकी संदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच’ असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोर्चाचे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी 9 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here