आधुनिक भारताच्या उभारणीत स्वर्गीय राजीव गांधीचे मोठे योगदान: आमदार सुभाष धोटे.
आधुनिक भारताच्या उभारणीत स्वर्गीय राजीव गांधीचे मोठे योगदान: आमदार सुभाष धोटे.

आधुनिक भारताच्या उभारणीत स्वर्गीय राजीव गांधीचे मोठे योगदान: आमदार सुभाष धोटे.

राजुरा काँग्रेसच्या वतीने स्व. राजीव गांधी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन.

आधुनिक भारताच्या उभारणीत स्वर्गीय राजीव गांधीचे मोठे योगदान: आमदार सुभाष धोटे.
आधुनिक भारताच्या उभारणीत स्वर्गीय राजीव गांधीचे मोठे योगदान: आमदार सुभाष धोटे.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:-  काही माणसे जमिनीवर राज्य करतात तर काही माणसे लोकांच्या ह्रदयांवर राज्य करतात. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे आजही लोकांच्या ह्रदयावर राज्य करणारे लोकनेते आहेत. त्यांनी एकोणिसाव्या शतकात एकविसाव्या शतकातील बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. आधुनिक विचार आणि अचूक निर्णय क्षमता असणारे राजीव गांधी यांनी भारताला संचार क्रांती, कॉम्प्युटर क्रांती, शिक्षण क्रांती, १८ वर्षावरिल युवकांना मताधिकार, पंचायत राज असे अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय आणि योगदान दिले आहे. भारतीय कॉप्म्प्यूटर क्रांतीचे ते जनक मानले जातात. आज प्रत्येकांच्या हातात दिसणारे मोबाईल हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचाच परिणाम आहे. आज त्यांचा बलिदान दिवस आहे. त्यांच्या विचार आणि कृतीतून प्रेरणा घेऊन सर्वांनी जनसेवेचे व्रत जोपासले तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त करीत आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राजुरा कांग्रेसच्या वतीने काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, जेष्ठ नेते अशोकराव देशपांडे, स. न. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, सिनेट सदस्य अजय बतकमवार, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, योगिता भोयर, पुनम गिरसाळवे, शंकर गोनेलवार, शब्बीर पठाण, सय्यद साबीर, अॅड. रामभाऊ देवईकर, लहू चहारे, कवडु सातपुते, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, जगदीश बुटले, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here