फसलेल्या कापूस चुकारे मिळण्यासाठी शिवसेनेची बाजार समितीकड़े मागणी; शिवसेना खा.गुढे यांचा पुढाकार.

 ✒  मुकेश चौधरी ✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतीनिधी
हिंगणघाट दि.23:- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितिअंतर्गत नियुक्त कानगाव येथील मृत व्यापारी प्रविण कोल्हारकर यांचेकड़े प्रलंबित असलेली कापूस चुकाऱ्यापोटी फसलेली रक्कम एक कोटी 28 लाख रुपये.शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, यासाठी आज दि.22 रोजी
शिवसेना खासदार तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे नेतृत्वात बाजार समितिचे सभापती एड.सुधीर कोठारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार सामिति अंतर्गत येणाऱ्या शिवकृपा कृषी प्रक्रिया उदयोग या द्वारे 128 शेतकऱ्यांचे कापसाची खरेदी करण्यात आली होती, याच उदयोगाचे प्रविण कोलारकर हे भागीदार असून त्यांनी नुकतीच 12 एप्रिल रोजी याच उद्योगपरिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

स्व.कोलारकर यांचेमार्फत कापूस विकणाऱ्या 128 शेतकरी आता आर्थिकदृष्ट्या तंगीत आले असून त्यांना येत्या खरीप हंगामात बि-बियाणे, खते तसेच मशागतीसाठी पैश्याची गरज असल्याने त्यांचे कापूस चुकारे त्वरित चुकते करण्याची मागणी शिवसेनानेते खासदार अनंत गुढे यांचे नेतृत्वात करण्यात आली याप्रसंगी तुषार देवढे, उपजिल्हाप्रमुख, राजू खूपसरे, उपजिल्हाप्रमुख, सतीश ढोमणे, शहर प्रमुख, बालु अनासने, उपतालुकाप्रमुख, अभिनंदन मुनोत, युवा सेना जिल्हाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here