केंद्र शासनाने केले,आता राज्यशासनाला म्हणावे…डॉ.गुलवाडे
पेट्रोल-डिझेल वरील वॅट कमी करा
महानगर भाजपाची मागणी
हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.न.9356653707
चंद्रपूर : – महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासन वेळोवेळी निर्णय घेत आहे.असाच एक निर्णय केंद्राने घेतला.पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली.आणखी कपात करायची असेल तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ‘व्हॅट’ (राज्यशासनाचा कर) कमी करण्याची मागणी केली पाहिजे.केंद्र शासनाने केले,आता महाविकास आघाडीतील घटकांनी राज्य शासनाला म्हणावे, असे मत महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून रविवारी 22 मे ला व्यक्त केले आहे.
महागाईत होरपळत असलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला म्हणून शनिवारी मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा आणि उज्ज्वला योजनेंतर्गत सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुक्रमे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये कमी होणार आहेत. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी माहिती दिली. 7 एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या 22 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे. केंद्राने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती.केंद्रशासन सतत जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असताना राज्यशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र शासनाला बदनाम करीत आहे.राज्यशासनाने पेट्रोल वरील व्हॅट(17.13 रु,) व डिझेल वरील व्हॅट(14.12) कमी केल्यास महाराष्ट्रात हे दर 100 रु.च्या खाली येऊ शकतात.याचा अभ्यास आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी करावा,असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत पेट्रोल व डिझेल वरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी त्यांनी महानगर भाजपाच्यावतीने केली आहे.सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते तर जनतेला दिलासा द्यायचा असतो,अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.