भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा महाड येथे संपन्न
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा रविवार दि.22 मे 2022 रोजी सकाळी 12 वाजता वेलकम हॉटेल महाड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा श्री. गणेश काका जगताप, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. सीमाताई चव्हाण, महाराष्ट्र सरचिटणीस श्री. अंकुश देशमुख महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष श्री. राजू शर्मा कोकण विभाग अध्यक्षा सौ. शर्मिला ताई सतवे, महाराष्ट्र प्रदेश विलास उतेकर, व भाजपा किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते गणेश काका जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलंन करण्यात आले सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शर्मिला ताई सतवे यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. जनार्दन नाईक यांची रायगड जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून प्रभाकर झांजे, अशोक शेलार जिल्हा संघटक संतोष देशमुख महाड तालुका सचिव पांडुरंग मालुसरे, सहसचिव छाया सकपाळ, पोलादपूर तालुका अध्यक्ष हरिश्चन्द्र कदम, महाड तालुका अध्यक्ष नंदू सावंत, वरंध महिला अधक्षा आरती साळुंखे या सर्वांची गणेश काका जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी काका जगताप म्हणाले की शेतकरी हा देशाचा कणा असून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा अशाप्रकारे गावागावात काम करणार असल्याचे सांगितले आपले दुर्दैव असे की एम.आय.डी.सी असताना देखील नोकरी नाही व्यवसाय नाही अनेक शासकीय योजना लोकप्रतिनिधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहेत अशाप्रकारे शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चात सहभागी व्हा बाकीचे आमच्यावर सोडा काळजी करण्याचे कारण नाही पक्ष संघटना सदैव पाठीशी राहील अशाप्रकारे सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी महाड-पोलादपूर-माणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर झांजे यांनी केले व प्रास्ताविक अंकुश देशमुख यांनी केले