जनता कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून जोया खान प्रथम
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 23 मे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. जनता कनिष्ठ महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतून जोया खान (९३.३३%) या विद्यार्थिनीने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, प्रा. व्ही.एस.बोढाले, डॉ. ए.के.महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. जी. बी. दरवी, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी, प्रा. रवी जोगी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.