दहीवली गावात अवतरली जल गंगा पाणीप्रश्न चुटकी सरशी सुटला.
–किशोर पितळे-तळा तालुका प्रतिनिधी९०२८५५८५२९
तळा :- तळा तालुक्यातील दहिवली या गावात ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न गेल्या दशकापासून प्रलंबित होता. तो कायमस्वरूपी सोडविण्यात आला.
तळा तालुका शिंदे गट शिवसेना प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून गावामध्ये बोअरवेल मारण्याचे ठरवले आणि त्यांना यशही आले एका सोप्या उपायामुळे दहीवली गावचा पाणी प्रश्न चुटकीसरशी सुटला आहे.दि.२०.५.२०२४ हा दिवस दहिवली वासियांसाठी खुप आनंदाचा दिवस ठरला असून पाणी पुरवठा विभागामार्फत बोअरवेलच्या रूपाने पाण्याचे निराकरण करण्यात आले आहे. दहिवली गाव गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याने त्रस्त आहे गावात पाण्याची कमतरता असल्यामुळे मुंबईकर मंडळीने गावाकडे पाठ फिरवली आहे अशा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तळा तालुका शिंदे गट शिवसेना प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून दहीवली गावामध्ये जलजीवन योजनेतून नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन देखील येथील रहिवाशांना पाणीप्रश्न भेडसावत होता नळ फक्त दिखाव्यासाठी उरले होते. गेल्या दशका पासूनपिण्याचा हा प्रश्न रेंगाळला होता.दोनदिवसां पूर्वी दहिवली ग्रामस्थांनी गावातील पाणीटंचाई संदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांच्याबरोबर चर्चा केली होती हा विषय गाभीर्याने घेत प्रद्धूम्नठसाळ यांनी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा व गावातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधला आपले राजकीय वजन आणि अधिकारी वर्गाबरोबर असलेले संबंध यामुळे तातडीने दहिवली गावात बोअरवेल खोदण्यात आली आणि गावचे भाग्य उजळले . मोठ्या प्रमाणावर पाणी लागले पाण्याचे प्रेशर एवढे होते की जमिनीपासून पंधरा फूट उंची वरती पाणी उडत होते. मे महिन्यात सर्वत्र पाण्याची पातळी खालावत असताना पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने दहिवली ग्रामस्थ मुंबईकरांमध्ये सद्या आनंदाचे वातावरण असून शिवसेना तालुकाप्रमुख प्रद्युम्नठसाळ यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. बोअरवेलचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी अतिशय तत्परतेने सर्व कामांना तातडीने मंजुरी देऊन सहकार्य केले. त्यांचे देखील आभार दहिवली ग्रामस्थ यांनी मानले आहेत.गावचे सदस्य गणेश पंदेरे,मोहन दिवेकर मुंबईकर कमेटी,ग्रामस्थ यांच्याकडून चांगले सहकार्य मिळाले.शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी उसर ते दहीवली रस्त्याचे डांबरीकरण स्मशानाकडे कडे जाणारा रस्ता,अंगणवाडी अशा अनेक प्रकारची कामे देखील मार्गी लावली आहेत.