गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आराठी श्रीवर्धनचा निकाल शंभर टक्के
✍️सचिन सतीश मापुस्कर ✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
दिघी – श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आराठीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले आहे. शाळेतून एकूण नऊ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून कुमारी मिरकर रोजमीन बशीर ही विद्यार्थिनी 85.4% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांकाने पास झाली तर मिश्रा त्रिकूराज रामेश्वर 75% गुण मिळवून द्वितीय तसेच सरखोत सारा सनाउल्ला 66.8% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व शिक्षकांचे संस्थेच्या सचिव डॉ.दिप्ती देशपांडे मॅडम ,संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे सर. विभागीय सचिव सन्मा. संत मॅडम मुबंई विभाग, श्रीवर्धन चे शाखा सचिव डॉ. मेश्राम सर व विभागाचे अधिक्षक डॉ. निलेश चव्हाण सर, उपशाखा सचिव सोनगीरकर सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सावंत मॅडम यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या