श्री शंभू पुत्र छत्रपती श्री थोरले शाहू महाराज पालखी सोहळा गांगवली येथे उत्साहात संपन्न…

श्री शंभू पुत्र छत्रपती श्री थोरले शाहू महाराज पालखी सोहळा गांगवली येथे उत्साहात संपन्न…

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगाव :-आशिया खंडातील सर्वोत्तम प्रशासक स्वराज्याचे चौथे छत्रपती श्री शंभू पुत्र छत्रपती श्री थोरले शाहू महाराज जयंती पालखी सोहळा श्री क्षेत्र गांगवली ते राजधानी सातारा नुकताच गांगवली येथे संपन्न झाला.यावेळी शिवनेरीला शिवजयंती आणि पुरंदरला शंभू जयंती तसेच रायगड किल्ल्यावर ज्या भव्यदिव्य स्वरूपात समारंभ साजरे होतात तसेच शंभुपुत्र चौथ्या छत्रपती शाहू राजे यांचे जन्मस्थळ स्मारक उदयास येईल आणि त्यासाठी प्रशासन आणि शिवभक्त यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुशीलकुमार कदम यांनी सांगितले.शिवाव्याख्याती सायली भोसले पाटील हिने पहिला शाहू महाराज यांचा जन्मसोहळ्याचा पोवाडा स्वतः लिहून सादर केला. रायगड भूषण रोहित सचिन भोईर आणि स्वरा सचिन भोईर यांनी जन्मोत्सवाच्या पूर्व संधेला स्वरसंध्या हा शास्त्रीय संगीत कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला मुंबई, ठाणे, पुणे, भोर, सातारा, सांगली, मिरज, कर्जत आणि माणगांव रायगडचे तमाम शिवभक्त मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज यांचे साडू यांचे वंशज रघुनाथ दौलतराव डुबल इनामदार, सदाशिवगड, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते तळबीड, प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराव गुजर, प्रतापगडचे सरदार वीर कमलोजी साळुंखे यांचे वंशज सुहास शंकरराव साळुंखे,सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमंत राणोजीराजे घोरपडे, पावनखिंड मध्ये शौर्य गाजवलेले 300 बांदल यांचे वंशज संतोष बांदल, बेटर सोसायटी फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजुषा ताई, आई कणकाई संस्थेचे अध्यक्ष रायगड भुषण सुशील कदम, ना. भरतशेठ गोगावले यांची कन्या शीतलताई गोगावले- कदम, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलीमाताई घोसाळकर, विश्वस्त ज्ञानदेव दाखिणकर, उपसरपंच अनिल वनगुले, सदस्य रामचंद्र दाखिणकर, कृष्णा वाघमारे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.आता चालू स्मारक कामासाठी 50 लक्ष निधी भरतशेठ यांनी दिला आहे. आणि आणखी वाढीव 4 कोटी प्रस्तावित केलाय आणि वर्षभरात भव्य वास्तू उभी राहील हे शीतल ताई गोगावले यांनी यावेळी अश्वसित केलं आणि शुभेच्छा दिल्या.शाहू महाराज यांचे जीवनपट पुस्तकाचे प्रकाशन शितळताई गोगावले आणि मावळ्यांचे वंशज यांचे हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती थोरले शाहू महाराज स्मारक समिती गांगवली,ग्रुप ग्रामपंचायत गांगवली,समस्त गांगवलीकर ग्रामस्थ, छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान तोंडलेकरवाडी,बेटर सोसायटी फाउंडेशन,छत्रपती शाहू महाराज पालखी सोहळा सातारा ग्रुप यांनी केले होते. छत्रपती थोरले शाहू महाराज स्मारक समिती अध्यक्ष ॲड. अच्युत तोंडलेकर यांनी कार्यक्रम प्रस्तावना आणि संपूर्ण सुरू असलेले स्मारक कामाविषयी तसेच भविष्यात निर्माण होणारे तीर्थक्षेत्र याविषयी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मारक समिती अध्यक्ष ॲड. अच्युत तोंडलेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत सवातकर, खजिनदार रामदास दाखिणकर, सहखजिनदार रोशन खरस, सचिव अनिल वनगुले, सहसचिव सुमित पवार, सदस्य विशाल तोंडलेकर, ज्ञानदेव दाखिणकर, राजेंद्र बाईत, समीर तोंडलेकर, गणेश दाखिणकर, अर्जुन तांदळेकर, राकेश सोनावणे, अमित तोंडलेकर, नागेश गायकवाड, सल्लागार नामदेव तोंडलेकर, रामचंद्र दाखिणकर, रवींद्र महाडिक, शंकर दाखिणकर यांनी विशेष मेहनत घेतली.