कामगार नोंदणी, नूतनीकरण,स्मार्ट कार्डचे कामकाज सुरू*

50

*कामगार नोंदणी, नूतनीकरण,स्मार्ट कार्डचे कामकाज सुरू*

कामगार नोंदणी, नूतनीकरण,स्मार्ट कार्डचे कामकाज सुरू*
कामगार नोंदणी, नूतनीकरण,स्मार्ट कार्डचे कामकाज सुरू*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण पावती, ओळखपत्र (स्मार्टकार्ड) चे वितरण करण्यासाठी सोमवारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र, मंगळवारी औरंगाबाद व फुलंब्री तालुका, बुधवारी गंगापूर व खुलताबाद तालुका, गुरूवारी सिल्लोड, वैजापूर व कन्नड तालुका, शुक्रवारी पैठण व सोयगाव तालुका अशा प्रकारे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
नमूद केलेल्या दिवशीच संबंधित क्षेत्र, तालुक्यातील नोंदणी, नूतनीकरण तसेच ओळखपत्राचे वितरण कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यास्तव त्याच तालुक्यातील, क्षेत्रातील बांधकाम कामगारांनी त्यांना नेमून दिलेल्या दिवशी कार्यालयात संबंधित कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी, नूतनीकरण पावती तसेच स्मार्ट कार्ड निर्धारीत केलेले शुल्क जमा करून घेवून जावे. निश्चित केलेल्या दिवसाशिवाय अन्य दिवशी बांधकाम कामगार कार्यालयात नोंदणी, नूतनीकरण पावती तसेच स्मार्ट कार्डचे वितरण केले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक कामगार आयुक्त शर्वरी पोटे यांनी कळवले आहे.