*नगरपरिषद ब्रम्हपुरी*
*शहर विकास योजना अवसानघातकी,पोलिसात तक्रार दाखल*
*सर्वसाधारण सभेत सोळा सद्यस्यांचा सभात्याग*

*शहर विकास योजना अवसानघातकी,पोलिसात तक्रार दाखल*
*सर्वसाधारण सभेत सोळा सद्यस्यांचा सभात्याग*
ब्रम्हपुरी :-
ब्रह्मपुरी शहराची सुधारित विकास योजना आराखडा तयार करण्यावरून नगरपरिषद मधील सत्तारूढ व विरोधी पक्षातील सदस्यांनी मंगळवार 22 जून ला आयोजित नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत सोळा सदस्यांनी सभात्याग केल्याने एकच गोंधळ उडाला . तर ऍड दीपक शुक्ला, नगरसेवक तथा नियोजन व विकास सभापती यांनी मुख्याधिकारी न प ब्रम्हपुरी, रचना सहाय्यक न प, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रपूर, अधीक्षक अभियंता महा जीवन प्राधिकरण चंद्रपूर आणी ईतर काही लोकांवर पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल केल्याने पालिका व शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सर्वसाधारण सभा सुरु होण्यापूर्वीच विकास आराखडा कंत्राट भ्रष्टाचार प्रकरणाची वस्तुस्थिती व सत्य बाहेर आल्याशिवाय सभेचे काम चालू द्यायचे नाही अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या सात सद्यस्यांनी, तसेच विदर्भ माझा पक्षाच्या सहा सद्यस्यानी व भारतीय जनता पार्टी च्या तीन सद्यस्यांनी घेऊन सभेच्या उपस्थिती रजिस्टर वर प्रत्यक्षात स्वाक्षरी न करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होईस्त्रव कामकाज चालू न देण्याची भूमिका घेऊन सभेवर बहिष्कार टाकत एकंदरीत सोळा सदस्यांनी सभात्याग केला.
तर ऍड श्री दीपक शुक्ला यांनी पोलिसात तक्रार दाखल करत,अत्यंत बिकट काळात संगणमत करून, जनतेशी व शासनाशी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसोबत विश्वास घात करून नगरपालिका फंडातील सुमारे 3,00,000 /- रुपयाची शासनाविरुद्ध कट रचून सुमारे 2,00,00,000/- रुपयाचे आर्थिक फसवणूक करण्याचा गंभीर व दखलपात्र स्वरूपाचा अपराध लोकसेवक, मुख्याधिकारी न प ब्रम्हपुरी, रचना सहाय्यक न प ब्रम्हपुरी , जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रपूर, अधीक्षक अभियंता महा जीवन प्राधिकरण चंद्रपूर व ईतर यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस स्टेशनं ला दाखल तक्रारीत केले आहेत.