*शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, परवाना जारी करण्यास परवानगी*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्यासाठीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमध्ये राज्यातील काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.अशा प्रकारच्या दोषी विरोधात मोटार वाहन कायदा, कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल अशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळवले आहे.
महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कुल व इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थांविरूद्ध पोलीस कारवाई तर केली जाईलच, पण या व्यतिरिक्त, महा ई-सेवा केंद्रा विरूद्ध जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कुल विरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफे विरूद्ध पोलीस विभाग (सायबर सेल) आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार आहेत. तसेच अशा प्रकारचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ) यांच्याकडे तक्रार करावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सं. प्र. मेत्रेवार यांनी कळवले आहे.