एसएससी मार्च २०२२ मध्ये इंग्लिश स्कूल बामणोली स्कूलचा निकाल १००%

47

एसएससी मार्च २०२२ मध्ये इंग्लिश स्कूल बामणोली स्कूलचा निकाल १००%

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

 मो.न: ८०८००९२३०१

माणगांव:- माणगांव तालुक्यातील बामणोली येतील इंग्लिश स्कूल बामणोली दहावीच्या निकालाची परंपरा शाळेच्या स्थापने पासून कायम ठेवली असून संलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. इंग्लिश स्कूल चा विध्यार्थी गुगळे संकेत दिलीप याने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक काढला तसेच द्वितीय क्रमांक कुमारी प्रार्थना मंगेश वाढवलं हिने ८७.८० टक्के मिळविले,तृतीय क्रमांकांची मानकरी कुमारी सुजल सुभाष वाढवलं हिने ८७.४0 टक्के मिळविले.

इंग्लिश स्कूल बामणोली चे प्राचार्य रघुनाथ जगदाळे सर, उपमुख्याध्यापक वालगुडे सर, कदम सर, खिडबीडे सर, पाटील सर, दुरुगकर सर, पवार मॅडम, प्रभाले मॅडम तसेच सर्व शालेय कर्मचारी याच्याकडून विध्याथ्याना मार्गदर्शन मिळाले कोव्हीड सक्रमन काळ ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण अशा अडचणी वर मात करून विध्यार्थी व शिक्षकांनी मेहनत घेऊन शाळेला यश मिळवून दिले आहे. असे सांगून इंग्लिश स्कूल बामणोली चे मुख्याध्यापक जगदाळे सर यांनी यांनी विध्यार्थी व शिक्षकाचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.