सर्पदंश, श्वानदंश, मृत्यूच्या घटना घडण्यापासून घ्या दक्षता

54

सर्पदंश, श्वानदंश, मृत्यूच्या घटना घडण्यापासून घ्या दक्षता, प्राथमिक उपचार व व्यवस्थापनावर मार्गदर्शन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो.न: 8830857351

चंद्रपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणानुसार सर्पदंश, स्वानदंश यामुळे होणारे मृत्युदर ५० टक्क्यापर्यंत कमी करण्याकरिता प्राथमिक उपचार व व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकल्प संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक जितेंद्र राणगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेकरिता प्रशिक्षक म्हणून स्नेक बाइट हेल्थ अँण्ड एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर प्रियंका, डॉ. फ्रेस्टन सिरुर, डॉ. डी. सी.पटेल, डॉ. नम्रता, डॉ. भागवत आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सर्पदंश, स्वानदंश, प्राणिदंश यामुळे बऱ्याच वेळा प्रथमोपचार व उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा घटना घडण्यापासून दक्षता घेण्याचे आवाहन केले.

जिल्हा प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आभार डॉ. सुधीर मेश्राम यांनी मानले. कार्यशाळेत मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता डॉ. प्रीती राजगोपाल तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.