माणगाव इंदापूर येथे भीषण अपघात, कंटेनर घरात घुसला

46

माणगाव इंदापूर येथे भीषण अपघात, कंटेनर घरात घुसून तीन घरांचे नुकसान कोणतीही जीवितहानी नाही

 

दिपक दपके

माणगाव शहर प्रतिनिधी

मो. न: 9271723603

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २२/०६/२०२२ रोजी रात्रौ २०.४५ वा.चे जि. रायगड सुमारास मौजे इंदापुर बाजारपेठ, ता. माणगांव जि. रायगड येथे. श्री. चिमनलाल भोगीलाल मेहता, वय ७९ वर्षे व्यवसाय मेहता जनरल स्टोअर्स, रा. इंदापुर ता. माणगांव, जि. रायगड यांचे व इतर मालकीचे तसेच इतर इसमांच्या | घरांना व दुकानांना सदर अपघातामधील कंटेनर ट्रक क्र.- सी.जी/०४ / एन. एम / ९२६६ ही वरील | अज्ञात चालक यांनी त्याचे ताब्यातील कंटेनर ट्रक क्र.- सी.जी/०४/एन.एम / ९२६६ हा मुंबई गोवा क्र.- हायवे रोडने गोवा बाजूकडुन मुंबई बाजुकडे चालवित घेवून जात असताना मौजे इंदापुर गावचे हद्दीत आलेवेळी सदर कंटेनर ट्रक यांतील आरोपी (अज्ञात चालक) याने अतिवेगाने चालवुन, रस्ताचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रस्त्यालगत असलेले | फिर्यादी व इतर इसमांच्या घरांना व दुकानांना ठोकर मारुन अपघात करुन नुकसान करुन लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करून तसेच सदर अपघाताबाबत काहीएक माहीती न देता पळुन गेला आहे म्हणुन. फिर्यादी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत