रायगडातील बोगस न्यूज पोर्टल पत्रकारांवर कारवाई होणार  

मीडिया वार्ता न्यूज

२३ जून,अलिबाग: रायगडातील तरुण तडफदार विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडातील बोगस न्यूज पोर्टल पत्रकारा बाबत जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल दिनांक 21 मार्च 2022 रोजी उपस्थित केलेल्या औचित्य मुद्द्यावरून लवकरच रायगड पोलिसां द्वारे कारवाई होणार असल्याने पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत.      

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही अतिउत्साही संपादकांनी स्वतःचे न्यूज पोर्टल सुरू केलेले आहे. यात काही संपादकांनी नवीन न्यूज चॅनेल तयार करून आर. एन. आय. चा उल्लेख केलेला आहे .रजिस्ट्रेशन न्यूज पेपर ऑफ इंडिया हा फक्त वृत्तपत्राशी संबंधित असून ,न्यूज पोर्टल डिजीटल मिडीयाशी काही एक संबंध नसल्याने कायदेशीर रित्या अधिकृत नसून बोगस पत्रकार असल्याचे निदर्शनास आले आहेत. 

अशा बोगस पत्रकारांकडून सर्वसामान्य जनतेचा ब्लॅकमेकिंग, लुटमारी चे प्रकार व फसवणुक होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने अशा बोगस पत्रकारांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना रायगडातील सर्व पोलीस ठाण्यांना गृहविभाग प्रशासनाकडून आलेले परिपत्रक दयानंद गावडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांनी पाठविले आहे. त्यामुळे रायगडातील बोगस न्यूज पोर्टल व पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here