योग दिनानिमित्त घेतले मुलांनी
योग शिक्षणाचे धडे .
अहमदनगर ब्युरो चीफ
🖋सुनील भालेराव 🖋
मो. नं.9370127037.
सविस्तर वृत्त :-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वडझरी या छोट्याशा गावामध्ये जिल्हा परिषद या शाळेमध्ये मुलांना योग दिनानिमित्त शिक्षक व शिक्षिका यांच्यामार्फत योग योग प्रशिक्षण घेण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा .
वडझरी . येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वेळा सांस्कृतिक कार्यक्रम कवायत मैदानी खेळ वेगवेगळे ग्यादरिंग .
अशा विविध माध्यमातून शिस्त पूर्ण वातावरणामध्ये शाळेचे प्राचार्य व इतर सहकारी यांच्या सहमतीने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात .
योग दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका सुरेखा बोधक यांनी मुलांना योग प्रात्यक्षिक करून दाखवले .