श्री शिवशंभू प्रतिष्ठान रायगड तर्फे प्रा.मराठी मुलांची शाळा शालेय साहित्य वाटप.
–किशोर पितळे-तळा प्रतिनीधी ९०२८५५८५२९
तळा:- रायगड जिल्हा परीषद मराठी मुलांची शाळा (दगडी शाळा)येथे शनीवारी २२जून२४ रोजी श्री शिवशंभू प्रतिष्ठान रायगड तर्फे शैक्षणीक साहीत्य वाटप करण्यात आले.यावेळी विचारमंचकावरप्रतिष्ठान चे अध्यक्ष सुनिल खेरटकर नगराध्यक्षा माधुरी घोलपमुख्याधापिका प्रियंका जामकर निवृत शिक्षक मारुती शिर्के, शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्षा मीराशिगवण उपाध्यक्ष भास्कर गोळे, प्रतिष्ठानचे सदस्य चिंतामणी मोरे,दिपक पिंपळे,प्रकाश खेरटकर, हेमंत शिर्कै,वैभव कडव,आशिष जाधव सल्लागार बेला देसाई माजी केंद्र प्रमुख संदीप जामकर सह शिक्षक सुनिल बैकर,मितल वावेकर व्यापारी उपस्थीत होते उपस्थीत मान्यवरांचे फुलझाडे देऊन स्वागत केले. व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खेरटकर यांचे शाल श्रीफळ गुलाब फुल रोपटे सन्मान पत्र देऊन केले. यावेळी प्रास्ताविकात प्रियंका जामकर यांनी श्री शिव शंभू प्रतिष्ठान रायगड यांचे शाळेला जातो आम्ही उपक्रम९ हे घोष वाक्य घेऊन शैक्षणीक साहित्य वाटप करून सामाजीक कार्याला मदतीचा हात पुढे करीत आहेत. शैक्षणीक साहित्यापासून वंचीत राहू नये हा हेतू आहे.आज सातवी पर्यंत शिक्षण विद्यार्थी घेत आहेत.११५ विद्यार्थी पट संख्या आहे. पालकांचा कल वाढत आहे. मधल्या काळात पट संख्या अतीशय कमीहोती. सहशिक्षक सुनिल बैकर,मितल वावेकर यांच्या सहकाऱ्यातून शैक्षणीक पातळी वाढली आहे.सी बी ई एस नवोदय विद्यालय पुर्व परीक्षा,तसेच शिष्यवृती परीक्षेत सतत यश प्राप्त करीत असून रायगडातील एकमेव शाळा गेली जात आहे.त्यामुळे प्राथमिक शाळेकडे विद्यार्थी आकर्षीला जात आहे.खेरटकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि श्री शिवशंभू प्रतिष्ठान रायगडची स्थापना २०१६साली झाली असून हे नववे वर्ष आहे शाळेला जातो आम्ही उपक्रम ९ हेघोष वाक्य घेऊन शैक्षणीक साहित्य वाटप करून सामाजिक बांधीलकी जपत खारीचा वाटा उचलून कार्यकरीत आहोत.सामाजीक, क्रिडा, शैक्षणीक क्षैत्रात गेली नऊ प्रतिष्ठान कार्यरत आहे.आजप्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून होत असते.हा मुळ पाया असून गोरं गरिबी विद्यार्थी शिकला पाहीजे शैक्षणीक साहित्या पासून वंचीत राहिला नाही पाहिजे. गोरगरीब शेतकरी,कष्टकरी,पालकां कडून वेळेवर शैक्षणीक साहित्या मिळत नसते.या उद्देशाने प्रतिष्ठान सामाजीक कार्य करीत आहे.याबरोबर गड किल्ले संरक्षण व संवर्धन नैसर्गीक आपत्ती मध्ये देखील मदतीला असते.हे यापुढे देखील काम करीत रहाणार आहोत असे सांगीतले.यावेळी सेवा निवृत शिक्षक मारुती शिर्के गूरुजी यांनी आपल्याच तालुक्यातील टोकार्डे गावातील माजी विद्यार्थांनी आणी सहकारी यांचे सहभागातून श्री शिवशंभू प्रतिष्ठान स्थापन करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.शैक्षणीक साहित्य वाटप करून साहीत्या पासून वंचीत राहू नये.हि सकंल्पना घेऊन वाटप केले.मी त्यांचे आभार मानणार नाही तर त्यांचे अभिनंदन करीन.सामाजिक कार्य असेच पुढे सूरू राहो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनील बैकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मितल वावेकर यांनी केले.