नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

श्रीनगर येथे घाणीचे साम्राज्य ; साफ-सफाई करण्याची मागणी

शिलरतन लोखंडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मो. 8308653814

नांदेड : शहरातील श्रीनगर भागात मोकळ्या जागा आणि रस्त्यावर कचरा टाकल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. श्रीनगर येथे मोकळ्या जागेवर प्लास्टिक, कागदे सडलेले पालेभाज्या, घाण कचरा, मावा, तंबाखूचे जन्य कचरा पसरल्यामुळे रोडच्या नाल्यात पाण्याच्या बाटला घाण पाणी साचलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच सध्या पावसामुळे हा कचरा कुंजलेल्या अवस्थेत असल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत स्थानिक महानगरपालिका प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होत नाही किंवा त्याबाबत कुठल्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे निदशँनास येत आहे. नांदेड शहरातील मध्यभागी असलेले श्रीनगर ठिकाण असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी व वर्दळ असते. या परिसरात अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी भाड्याची रूम करून राहतात. असा प्रशिक्षित वस्तीत मोकळ्या जाग्यावर रोडच्या बाजूला घाणकचरा टाकत आहेत. संबंधित ठेकदाराकडून साफ – सफाई कडे लक्ष दिले जात नाही. वेळेवर कचरा संकलन केल्या जात नाही. शिवाय साचलेला कचराही उचलला जात नाही. त्यामुळे येथील कचरा हा प्रश्न गंभीर बनत आहे. या भागात घंटागाडी आठवड्यातून एक दिवस येते पण ते ही वेळेवर घंटागाडी येत नसल्याने घरातील नागरिक, महिला, विद्यार्थी घरातील साचलेला कचरा मुख्य रस्त्याच्या मोकळ्या जागेत आणून टाकत आहेत. शिवाय लगतचे व्यावसायिकही रात्रीच्या वेळी रस्त्यावर,व मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत. त्यामुळे याठिकाणी या परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. याबरोबरच साथीचे आजार जडत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्वरीत या भागातील साफ,सफाईकडे लक्ष द्यावे. असी मागणी येथील नागरिकांची आहे.