दिलीप भोईर यांनी उचलले शिवधनुष्य
हजारो समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
ना. भरत गोगावले यांनी केले पक्षात स्वागत
आ. महेंद्र दळवी व दिलीप भोईर यांनी एकमेकांना आलिंगन देत वाद मिळल्याची दिली ग्वाही
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर व शिवसेना शिंदे गट आमदार महेंद्र दळवी यांची दिल जमाइ झाली असून दिलीप भोईर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आमदार महेंद्र दळवी व दिलीप भोईर यांनी एकमेकांना आलिंगन देत वाद मिळण्याची दीली ग्वाही. तसेच दिलीप भोईर यांच्या खांद्यावर जिल्ह्यात मोठी जबाबदारी देण्यात येईल अशे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत अलिबागची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यानंतर दिलीप भोईर यांच्यावर भाजपने निलंबनाची कारवाई केली. निवडणूक प्रचारात महेंद्र दळवी व दिलीप भोईर यांनी एकमेकांनवर जोरदार टीका केली. निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी शेकापे उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला. तर दिलीप भोईर सुमारे 33 हजार ५०० मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मागील काही दिवसापासून एकमेकांचे विरोधक असलेले आमदार महेंद्र दळवी व दिलीप भोईर हे कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते. यावरून ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. शनिवारी त्यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थिती शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी ताई दळवी, शिवसेनेचे अध्यक्ष राजा केणी ,महिला आघाडी प्रमुख संजीवनी नाईक, अलिबाग तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांच्यासह शिवसेनेचे अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
मी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारा कार्यकर्ता आहे. यापूर्वीच्या पक्षात काम केले ते पक्ष प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी जिल्ह्यात काम केले. विधानसभेत मी कुणाचा तरी आदेश घेऊनच अर्ज भरला होता. आता शिवसेनेत प्रवेश करत आहोत. आमदार महेंद्र दळवी व मी एकाच गुरुचे शिष्य आहोत. आमच्यातील मतभेद आता संपले असून “संघर्ष संपला, पाठिंबा वाढला” आहे.
दिलीप भोईर
माजी समाज कल्याण सभापती
दिलीप भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याची प्रचिती येईल. दिलीप भोईर सर्वसामान्य जनतेत मिसळणारे नेते आहेत. त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल. पक्ष जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी देणार होता ती जबाबदारी दिलीप भोईर यांना देण्यात येईल.
महेंद्र दळवी
आमदार
शिवसेनेत दिलीप भोईर यांचे स्वागत आहे. भोईर यांच्या खांद्यावर जिल्ह्यात मोठी जबाबदार देण्यात येईल. आगामी निवडणुकीत महायुती म्हणून जर प्रेमाने आले तर सर्वांना सोबत घेऊ.मात्र कुणी आगळीक केलीच तर आपला निर्णय आपण घेऊ. निवडणुकीची तुम्ही तयारी सुरू करा. भोईर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आपली ताकद वाढली आहे.
ना. भरत गोगावले