मुंबईत माणुसकीला काळीमा! नातवाने 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अवस्था पाहून पोलीसही हळहळले

मुंबईत माणुसकीला काळीमा! नातवाने 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अवस्था पाहून पोलीसही हळहळले

हिरामण गोरेगावकर
23 जून 2025

मुंबई :- मुंबईत नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या वृद्ध महिलेची सुटका करत, रुग्णालयात दाखल केलं आहे.   
आजी म्हणजे प्रत्येक नातवासाठी एक गोड आठवण असते. प्रत्येकासाठी आईनंतर या जगात जर सर्वाधिक कोणी प्रिय असेल तर ती आजी असते. काही वेळा तर आईपेक्षाही आजीवर जास्त जीव असतो. जितकी माया, काळजी आजी लावते तितकी कदाचित कोणीच लावत नाही. आजी म्हणजे बालपणी मिळालेली पहिली मैत्रीण असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच जेव्हा एखादी नात किंवा नातू आपल्या आजी-आजोबांना असभ्य वागणूक देतो तेव्हा भुवया उंचावणं साहजिक असतं. मुंबईत असाच माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार समोर आला आहे. एका नातवाने आपल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
मुंबईतील गोरेगाव येथे एका नातवाने आपल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला नातवाने आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 60 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातू कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यशोदा गायकवाड असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. 
महिलेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. कूपर रुग्णालयात डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. कॅन्सरच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने आजी पासून सुटका करण्या साठी हे कृत्य केल्याच समोर आळ आहे यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात त्यांनीच पोलिसांना ही माहिती दिली त्या नंतर पोलीस दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पण त्या वेळी घराल कुलूप होते . पोलिस नातू आणि कुटुंबीय यांचा शोध घेत आहेत पण ही घटना समोर आल्यानंतर पोलीसही हळहळ व्यक्त करत आहेत..