अपंग कोविडयोध्दाचे चार महिन्यांचे वेतन कापले गोंडपीपरी येथील प्रकार*

21

*अपंग कोविडयोध्दाचे चार महिन्यांचे वेतन कापले गोंडपीपरी येथील प्रकार*

 

अपंग कोविडयोध्दाचे चार महिन्यांचे वेतन कापले गोंडपीपरी येथील प्रकार*
अपंग कोविडयोध्दाचे चार महिन्यांचे वेतन कापले गोंडपीपरी येथील प्रकार*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी सविस्तर माहिती अशी की कोविडच्या अतिशय संकट काळात जिवाची बाजी लावून सेवा देणाऱ्या एका अपंग कोविडयोध्दाला तब्बल चार महिण्याच्या वेतनापासुन वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्या परीवारात आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे गोंडपीपरीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे वेतनासाठी कंटाळलेल्या आरोग्य सेवकाने आज जिल्हा पोलिस अधीक्षकासह जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलता चव्हाट्यावर आला आहे .डि .एन.मेश्राम हे धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत .जिवती तालुक्यात क्षेत्र कार्यकर्ता म्हणून त्यांनी अकरा वर्ष सेवा दिली
यानंतर शासनाने त्यांना पदोन्नती दिली व आरोग्य सेवक म्हणून बारा वर्षापासून पिएसी धाबा अंतर्गत ते सेवा देत आहेत मेश्राम हे अपंग आहेत त्यांचा एक पाय निकामी असून काठीच्या सहाय्याने ते आपली वाटचाल करीत आहे
कोविडच्या अतिशय गंभीर संकटात त्यांनी गोंडपीपरी नगरात सक्रियपणे.. प्रामाणिक पणे सेवा दिली पण गेल्या चार महिन्यांपासून तालुका आरोग्य अधिकारी चकोले यांच्या असवेदनसिलतेमुळ मेश्राम यांना तिन महीण्याचे वेतन देण्यात आले नाही
मेश्राम यांनी घरबांधणीसाठी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते . त्यांच्या मासीक पगारातून नियमितपणे मासीक हप्ता कापण्यात येत होता मेश्राम यांना शासनाने पदोन्नती तरं दिली पण त्यांना अद्यापही क्षेत्र कार्यकर्ता च्या आधारित च वेतन दिल्या जात आहे प्रशासनाच्या घोळ चुकीने खुप मोठा फटका बसला आहे या आधीच्या अधिकाऱ्यांनी मेश्राम यांचे वेतन काढत होते पण गोंडपीपरीचे तालूका आरोग्य अधिकारी दिनेश चकोले यांच्या निष्काळजी पणा मुळे गेल्या चार महीण्या पासुन मेश्राम यांचे पुर्ण वेतन कपात करण्यात आले कोविडची महामारी आल्यापासून अंपग असूनही मेश्राम यांनी अतिशय प्रभावी व प्रामाणिकपणे गोंडपीपरीत आरोग्य सेवा दिली त्यानी केलेल्या अतीउतम कार्यामुळे कोविडयोध्दा म्हणुन त्यांना गौरविण्यात आले पण आता या कोविडयोध्दाला चार महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही
यामुळे मेश्राम यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रामाणिकपणे सेवा देऊनही झालेल्या अन्यायाने त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी आज तालुका आरोग्य अधिकारी चकोले यांच्या विरोधात एसपी व मुख्यपालन अधिकार्याकडे तक्रार दाखल केली आहे
प्रशासनाने यात लक्ष घालून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे