नागपुर दोन दिवसापासून मुसळधार पाऊस नदी नाले तुडुंब वाहत आहे.

नागपुर दोन दिवसापासून मुसळधार पाऊस नदी नाले तुडुंब वाहत आहे.

नागपुर दोन दिवसापासून मुसळधार पाऊस नदी नाले तुडुंब वाहत आहे.
नागपुर दोन दिवसापासून मुसळधार पाऊस नदी नाले तुडुंब वाहत आहे.

युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9527526914

नागपुर,दि.23 जुलै:- नागपुरसह संपुर्ण विदर्भ आणि कळमेश्वर तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून पाऊसाला सुरवात झालेली असून चोहभोवताल मुसळधार पाऊस पडत आहे. नागपुर सह विदर्भात अनेक गावाचा संपर्क मुख्यालयाशी टुटलेला आहे. लोकांना घराच्या बाहेर जाणे कठीण झालेले आहे. तसेच गुरुवार ला सकाळी नऊ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली असून धो-धो पाऊस पडत आहे. तसेच अति वृष्टी सुद्धा झालेली आहे.

नागपुर जिल्हात मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पाऊसामुळे कळमेश्वर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरलेले आहेत आतापर्यंत झालेल्या झालेल्या पावसाची नोंद 404 मिलिमीटर झाल्याचे कळमेश्वरचे नायब तहसीलदार भुजाडे यांनी सांगितले या पावसामुळे नागपूर काटोल कळमेश्वर मधील खडक नाल्याला फार मोठा पूर आल्याने काटोल जाणारी वाहतूक वाहतूक कोंडी झाल्यामुळे एमआयडीसी मार्गे बायपास ने वळविण्यात आली आहे. तसेच कळमेश्वर गोरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने शेतकरी शेतमजूर नाल्याच्या काठावर अडकून पडलेले आहे. नदी नाल्याना पुर आल्यामुळे कळमेश्वर शहरातून वाहणारे पाणी लगतच्या वस्तीमध्ये घुसल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी पुरातून वाहून गेलेल्या दोन इसमाची घटना ताजी असल्यामुळे नगर प्रशासन महसूल विभाग पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून नाल्याकाठी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील शेती जलमय झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे.