*गोंडपीपरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था लोकप्रतीनिधीचे दुर्लक्ष*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी येथे शिवाजी चौक ते संविधान चौक या रस्त्याच्यी दुरव्यस्ता झालेली आहे गोंडपीपरी येथील मुख्य महामार्गाचे काम झालेले असले तरी येथील गावातील बहुतांश रस्ते रखडले आहेत ” रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते ” हेच कळेनासे झाले आहे गावातील बहुतांश रोड हे ठेकेदारानी फोडून ठेवले आहे त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील अंतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शहरातील काही रस्ताची दूरवस्था झाली असून रस्ते दुरुस्ती बाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या गेली नाही
नागरीकांना वाहने चालविणे तसेच पाईचालणे देखील अवघड झाले आहे यामुळे पाईचालणारे अणेक नागरिक घसरून पडले आहे तर खड्ड्यांमुळे दुचाकी स्वाराना माणेचे व कमरेचे त्रास होत आहे यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जेव्हा निवडणूक येतात तेव्हा लोकप्रतिनिधी जागे होतात आता मात्र लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसुन येत आहे