भर पावसात बोथली वासीयांची पाण्यासाठी वणवणः ——महीला व पुरुषांचा नगरपरीषदेवर मोर्चा
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड—नागभीड नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या बोथली या गावात पंधरा दिवसापासुन पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी बोथली वासीयांची वणवण सुरु आहे. पाणी पुरवठा बंद असल्याचे गावातीलच नगरपरीषद कर्मचारी यांना सांगण्यात आले होते.परंतु पंधरा दिवस लोटुनही याकडे कुणीही लक्ष दिले नाही. नंतर गावकर्यांनी पुन्हा त्या कर्मचाऱ्यांला विचारले असता मी पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगितले होते.परंतु नगरपरीषद याकडे लक्ष देत नसेल तर मी काहीही करु शकत नाही.अशी माहीती गावकर्यांनी दीली. पाण्यासाठी ञस्त असलेल्या बोथलीवासीयांनी थेट नगरपरीषद गाठली. आणी नगरपरीषदचे मुख्याधिकारी यांना तात्काळ पाणी पुरवठा करण्याचे सह्याचे निवेदन दिले. पाणी पुरवठा बंद असल्याने बोआर पंपचे पाणी वापरण्यात येत असले तरी या बोअरवेल मध्ये ब्लिचींग पावडर टाकलेला नाही. काही बोअरवेल बंद आहेत. दुषीत पाणी प्यालाने साथीचे रोग होवु शकतात. डायरीया, टायफाईड अशा आजारांना आमंञण देणै होईल. आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने महीलांना नाहक ञास होत आहे. मजुरीला सुद्धा मुकावे लागत आहे. तर शेतीच्या कामावर जायला ऊशिर होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे. *प्रतिक्रीया*– या बाबत नागभीड नगरपरीषदचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांना विचारणा केली असता बोथली येथील पाणी पुरवठा बंद असल्याचे आज कळले.यापुर्वी मला कोणतीही माहीती कर्मचाऱ्यांनी वा नागरीकांनी दिली नाही.मला त्याचवेळी माहीती दिली असती तर नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला असता. तरीसुद्धा मी आजच्या आज कर्मचाऱ्यांना सांगुन पाईपलाईन दुरुस्तीचे सांगितले आहे.नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाईपलाईन दुरुस्त होई प्रयंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल.नागरीकांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास कार्यालयात येऊन नोंदवाव्या किंवा मला प्रत्यक्षात भेटावे.