इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर, : – जिल्ह्यात काल शुक्रवारपासून रात्री संततधार पाऊसाला सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे इरई धरण भरले असून आज (शनिवार) सकाळी आठ वाजताचे सुमारास धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इरई नदी दुथडी भरून वाहत आहे, असाच पाऊस सुरू राहिला तर नदीतील पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पूर आला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.