एनसीसी विद्यार्थ्यांनी केली ‘तिरंगा’ अभियानाची जनजागृती
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀73500050548🪀
वाशिम /वाशिम
वाशिम स्थानिक बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियान राबवून नागरीकांना ध्वजसंहितेचे पालन करुन आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनेंट कर्नल सी. पी बदोला याच्या मार्गदर्शनात एनसीसी ऑफिसर अमोल काळे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला.
यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी पोस्टर व तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून नागरीकांना ध्वज फडकविण्याच्या नियमाचे पालन करुन प्रत्येक घरावर ११ ते १७ ऑगष्ट दरम्यान तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना एनसीसी अधिकारी अमोल काळे म्हणाले की, राष्ट्रध्वजाची उभारणी करतांना ध्वज संहितेचे पालन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वज सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत लावण्यात यावा. ध्वजाविषयी आदरभावना वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रध्वज शैक्षणिक संस्थामध्ये लावता येईल. मुख्याध्यापक, विद्यार्थी नेता आणि ध्वज फडकविणारी व्यक्ती ध्वजस्तंभाच्या मागे तीन पावले उभे राहावे. ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशाप्रकारे लावला पाहिजे. येत्या ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमात प्रत्येक नागरीकाच्या घरावर, सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी आस्थापना / सहकारी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज उभारतांना प्रत्येक नागरीकाने भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे असे काळे म्हणाले आपण सर्व मिळून देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभिमानाने साजरा करूया असे आव्हान एनसीसी विद्याथ्यार्ंनी केले. या उपक्रमामध्ये पोस्टर व सोशल मिडियाच्या माध्यमातून विद्यार्थी जनजागृती करीत आहेत.
या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.✍