माहिती अधिकार अर्जाने केली रोहा पंचायत समितीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

माहिती अधिकार अर्जाने केली रोहा पंचायत समितीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

माहिती अधिकार अर्जाने केली रोहा पंचायत समितीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- पंचायत समिती रोहा सेस फंडाअंतर्गत कामे न करताच बिले लाटल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते शहानवाज मुकादम यांनी सेस फंडातून रोहा तालुक्यातील केलेल्या कामांची माहिती माहिती अधिकार अर्जाद्वारे मागविली असता तालुक्यातील बिरवाडी कब्रस्तानात मुरूम भराव टाकणे, खैरे खुर्द बस स्टॅन्ड बांधणे व सुशोभीकरण करणे, सारसोली बस स्टॅन्ड समोर गटार बांधणे ही सर्व कामे सेस फंडांतर्गत कागदोपत्री दाखवून कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढून भ्रष्टाचार केल्याची माहिती माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते शहानवाज मुकादम यांनी उघड केली आहे या भ्रष्टाचाराबाबत गट विकास अधिकारी रोहा, उपकार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प यांना पत्र व्यवहार करून ठोस कारवाई करण्याची मागणी देखील शहानवाज मुकादम यांनी केली परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केराची टोपली दाखवली यामुळे उपायुक्त व मुख्य आयुक्त ग्रामपंचायत विभाग मंत्रालय, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तात्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, तत्कालीन रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांना सर्वांना पत्रव्यवहार करून तक्रारदार यांनी सदरील कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाठ राखण करून वाचविण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून केला जात आहे यामुळे तक्रारदार यांना धमकीचे फोन येत आहेत परंतु अशा प्रकारच्या धमक्यांना मी घाबरत नसल्याचे सांगून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी गप्प बसणार नसून माझा लढा सुरूच ठेवणार असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्ता शहानवाज मुकादम यांनी सांगितले