माणगांव तालुक्यात दरडग्रस्त गावाची प्रात आणि तहसीलदारांकडून पाहणी…

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

कोकण :-रायगड जिल्ह्यात ईर्शाळवाडी दुरघटने संपूर्ण जिल्हा हदरला असून या घटनेमुले सर्वत्र तालुक्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने माणगांव उपविभागी अधिकारी डाँ. संदिपान सानप तसेच माणगांव तहसीलदार विकास गारूडकर यांनी शुक्रवार दि.२१ जुलै रोजी माणगांव तालुक्यातील पहेल,भादरे,गारळ,घोटवळ,न्हावे,रेपोली या काही गावाच्या भागात सर्वे केला असून यामध्ये इंदापुर विभागातील घोटवळ या गावाती घरे ही दरड भागात येत असून यातील ६० घराना दरडीचा धोका वाटत असून या घरातील नागरिकांना स्थलातर करण्यासाठी सुचना देण्यात  आल्याआहेत.घोटवळ या गावात १७० घरे असून या गावाची लोकसंख्या १००० हजारच्या आसपास आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी नजीक डोंगराच्या कुशीत हा गाव गेली सहा ते सात पिढ्या वसलेलाअसून आता या गावाला दरडीचा मोठा धोका होण्याची शक्यता नागरिकांन कडून वर्तवली जात आहे.

घोटवळ गावातील ६० घरातील नागरिकांना स्थलातराच्या सुचना

दरडग्रस्त गावाच्या यादीत घोटवळ गाव डेंजर झोन मध्ये

डोंगराच्या खालच्या बाजूस हे गाव वसले असून या डोंगराची माती ही भुसभुशीत असल्याने या डोंगराती मोठे मोठे महाकाय दगड हे काही अतंरावर सरकून येऊन अडकून पडलेले आहेत. हे दडग अजून थोडे सरकले तर ते गावातील घरांनवर येवून मोठी दुर्गघटना होऊ शकते तसेच या डोंगराच्या मातीचा भाग देखील पडून मोठी दुर्घटना होऊ शकते,गेले चार ते पाच दिवसातून सततधार कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मौजे. घोटवळ येथे संभाव्य दडग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी  माणगावचे उपविभागीय अधिकारी डाँ. संदिपान सानप, तहसीलदार विकास गारुडकर, तसेच माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घोटवळ गावाला समक्ष भेट दिली त्यावेळी  घोटवळ गावच्या वरच्या बाजूस असणाऱ्या डोंगराची त्यांनी पाहणी केली असता मुसळधार पावसाच्या या काळात दरड कोसळण्याचा मोठा धोका असल्याने त्याबाबत अधिकाऱ्यांनी वर्गाने यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी  मंडळ अधिकारी गडदे, मडळ अधिकारी टेंबे, तलाटी विशाल वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते दिपक शेठ जाधव, राम येलकर, शिपाई बुध्दघोष पवार, पोलीस पाटील,ग्रामसेवक मोरे,घोटवळ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, तसेच कोणत्याही आपत्तीच्या काळात माणगांवचे प्रशासन आँन डूटी चोवीस तास सदैव आपल्या सोबत असल्याची खात्री देखील यावेळी गावकऱ्यांना वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामस्थाना बोलताना सांगितले.

माणगांव तालुक्यातील घोटवळ या दरडग्रस्त गावाची पाहाणी करताना माणगांव प्रात तसेच तहसीलदार,तलाटी, कर्मचारी व ग्रामस्थ दिसत आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here