पुणे येथे आज झालेल्या रनिंग स्पर्धेत अक्कलकुवा तालुक्यातील काठी, येथील बलवंत तडवी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला…
प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो: 9511655877
नंदुरबार : आज दि. 23 जुलै 2023 रोजी पुणे येथे झालेल्या रनिंग स्पर्धा मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असलेले काठी,चापलाफळी येथील बलवंत बिज्या तडवी यांनी रनींग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहेत. त्यामुळे काठी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून त्याच्या अभिनंदन करण्यात आला आहे. व त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
आजचे तरुण व युवा वर्ग हे आपल्या भारत देशाचे विकास घडवणारे आहे त्यामुळे स्वतः ला कमी समजू नका स्वतः वर विश्वास ठेवा एक दिवशी तुम्ही पण नक्की यशस्वी होणार हे मात्र निश्चित आहेत. आता आदिवासी खेड्यापाड्यातील मुले सुद्धा शिक्षणात, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, सरळसेवा, व इतर परीक्षा मध्ये यशस्वी होतांना दिसत आहे.