माहूर शहरात पोलिसाच्या आशीर्वादाने भाजीपाल्या सारखे खुलेआम थाटले मटक्याचे अड्डे…!

माहूर शहरात पोलिसाच्या आशीर्वादाने भाजीपाल्या सारखे खुलेआम थाटले मटक्याचे अड्डे…!

आदित्य खंदारे
माहूर/प्रतिनिधी
7350030243

माहूर :- माहूर शहरात महामार्ग रोडच्या कडेला भाजीपाल्या सारखे थाटले मटक्याचे अड्डे
टपऱ्यामध्ये खुलेआम अवैध मटका सुरू आहे. तरीही पोलीस प्रशासन या मटक्या वाल्यांवर का दुर्लक्ष केले जात आहे. असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे

एसटी बस स्टॉपच्या मेन गेटला लागून भाजीपाल्या सारखे थाटले मटक्याचे अड्डे, शाळेकरी विद्यार्थ्यांना ये,जा, करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांनी पंधरा दिवसांपूर्वी मटक्यावाल्याविरुद्ध कडक कारवाई केली होती. हात भट्टी दारू विरोधात धाडसत्र मोहीम सुरू आहे. परंतु आता या मटक्या वाल्यांना खुलेआम मटका चालवण्यासाठी एनओसी कोणी दिली. अशी चर्चा माहूर तालुक्यातून सुरू आहे. माहूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध मटका धंद्याकडे साहेबांचं लक्ष कसं गेलं नाही हा प्रश्न आहे.

माहूर शहरांमध्ये दहा ते पंधरा पंटर अवैध मटका धंदा घेत असताना मात्र एलसीबी पथक व पोलीस स्टेशनचे इकडे दुर्लक्ष का..? कोणाच्या आशीर्वादाने धंदे चालतात…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेला शर्ट इन मध्ये राहणारा एक पंटर या दोन नंबर धंदे करणाऱ्यांचा पाठीराखा असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.

आजवर अनेक पोलीस निरीक्षक बदलले मात्र, भाई जैसे थे तशीच परिस्थिती आहे आपली.
शिवाय यांचे सर्वांशी (अवैध धंदेवाल्यांशी) मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या. अवैध धंदेवाल्यांचा पाठीराख्यांचा बंदोबस्त करून कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकाकडून होत आहे….