*वर्धा :- नागपुर बिरो चीफ प्रशांत जगताप:-* पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासू वर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वर्धा येथील पिपरी ग्रामपंचायत परिक्षेत्रात येणारा गिरी पेठ येते घडली.
पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन रोज पत्नीला त्रास देणार्या पतीने सासूच्या घरत शिरुन पत्नी जीव घेणारा चाकु हल्ला केला. हा वाद सोडवीण्याकरिता सासू गेली असता तीलाही चाकू मारून गंभीर जखमी करण्यात आले. आई सह मुलीला गंभीर स्थितित सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मुलीला नागपुर येथील मेडिकल रुग्णालयामध्ये नेले असता तिचा मुत्यू झाला. या घटनेची माहीती मीळतात वर्धा पोलिस घटना स्थळी पोहोचली आणी शनीवारी दुपारी आरोपी पतीला अत्यंंत शिताफिने रेल्वे स्थानक परिसरातुन जेरबंद करण्यात आले.
आरोपीचे नाव विनोद उरकूडे वय 40 राहणार आंजी (पेठ) असे आहे. दीपमाला धनजय नेहारे 47 ही महिला तिची मुलगी मयूरी विनोद उरकूडेसह जेवन करुन झोपली होती. विनोद हा रात्री घराचा दाराला लाथा मारून दार तोडून घरात प्रवेश केला. मयूरीला शिव्या देऊन तू तुझा आईचा घरी का आली म्हणत तीचा चारीत्र्यावर संशय घेऊन विनोद ने जवळ असलेल्या चाकूने मयूरीच्या पाठीवर सपासप वार करुन तीला गंभीररित्या जखमी केले. त्यावेळी मयूरीची आई दिपमाला ही मुलीला वाचविण्यासाठी गेली असता विनोद ने सासूच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर चाकूचे वार करून गंंभीर जखमी केले. त्यांची आरडाओरडा सुरु असताना विनोद हा घटनास्थळावरुन पळून गेला. शेजारी राहणारा नागरीकांंनी दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मयूरीची प्रकृति चिंताजनक असल्याने व रक्तस्त्राव थांबत नसल्याने तीला नागपुर मेडिकल हौस्पितलमध्ये हलविण्यात आले. तर दिपमालाचा उपचार सेवाग्राम रुग्णालयात सुरु आहे. दीपमालानी पोलीसांना दिलेल्या बयानात संपुर्ण घटनाक्रम कथन केला. यावरुन रामनगर पोलिसांंनी विनोद उरकूडे विरुध्द अपराध 438 कलम 452, 326, 504 अन्वये गुन्ह्याची नोंद केली होती. पण मयूरीचा नागपुर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रात्री आरोपी पती वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन आरोपी विनोद उरकुडेचा शोध सुरु केला. शनीवारी वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहीती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यांंनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतल.