महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटनं धोका वाढला, एका दिवसात समोर आले 27 रुग्ण.

==मुख्य मुद्दे==
● महाराष्ट्रात 100 च्या वर रुग्ण
● तिस-या लाटेची संभावना वाढली.
● मिडिया वार्ता न्यूज कडुन खबरदारी घेण्याची विनंती.
✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.23 ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता कुठे तरी नियंत्रणात आली आहे. मात्र दुसरीकडे आता राज्यात डेल्टा व्हेरिएंटनं थैमान घालायला सुरवात केली आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. माघील 24 तासात डेल्ट प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. महाराष्ट्र राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 103 झाली आहे.
महाराष्ट्रात माघील 24 तासात डेल्टा प्लसचे 27 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता डेल्टा प्लसने राज्यातील नागरिक आणि राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. आज सर्वाधिक रुग्ण अमरावती आणि गडचिरोतील सापडले आहेत.
माघील कोणत्या 24 तासात कोनत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
अमरावती जिल्हात 06, गडचिरोली जिल्हात 06, नागपूर जिल्हात 05, अहमदनगर जिल्हात 04, यवतमाळ जिल्हात 03, नाशिक जिल्ह्यात 02, भंडारा जिल्हात 01 हे निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती डेल्टा प्लस म्हणजे AY.1 हा डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन आहे. जो अधिक संसर्गजन्य आहे. जूनमध्ये हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता.
जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण संख्या शून्यावर आली होती. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली.
ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.